0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे.दाभोळकर, पानसरे यांची हत्या झाल्यानंतर धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. 

Post a comment

 
Top