web-ads-yml-750x100

Breaking News

२९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २९ फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला ६ दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितलं जातं. 

No comments