web-ads-yml-728x90

Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून - संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार  दिनांक 24  फेब्रुवारी 2020  पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.विधान भवनात  विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.श्री परब म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्‍चित केला असून यात 18 दिवस कामकाज होणार आहे.गुरुवार दि. 6 मार्च 2020 रोजी सन 2020- 21 या वर्षात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी सन 2019 20 च्या पुरवणी मागण्या तसेच सन 2014 -2015, सन 2015- 16, व 2016 - 17 या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील.तसेच या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे.  त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती श्री. परब यांनी दिली.

No comments