0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही. या अर्थसंकल्पात गुंतवणूकीला प्रोत्साहन दिलं जाईल अशी अपेक्षा होती. ज्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात बदल होतील अशी अपेक्षा होती. पण असं काही झालं नाही, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
     या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला महत्व दिले असं म्हणत असले तर ते ही खर नाही. अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद केलेला आकडा बघितला आणि सध्या देशाची संबध गरज बघितली तर यात जमीन अस्मानाचा फरक दिसून येईल. तरुण वर्गात असलेली बेरीजगारी पाहता ती दूर करण्यासाठी कोणतेही प्रभावी पाऊल या अर्थसंकल्पातुन उचलले दिसत नाही. विकेंद्रीत स्वरूपातील औद्योगिकीकरणाकडे या अर्थसंकल्पात लक्ष दिलेले दिसत नाही. एकूण काय तर सर्वच क्षेत्रात निराशा दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे.

Post a comment

 
Top