0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
‘मुलींनो आरोग्याविषयी जागरुक रहा, वाढत्यावयाबरोबर शारीरिक बदल सकारात्मक दृष्ट्या स्वीकारा,निरोगी मन आणि शरीर ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे,सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्त्रीयांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम रहावे’ असे आवाहन आरोग्य विभागाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.मंजुषा घुमारे यांनी केले.
            जनसेवा शिक्षण मंडळ,मुरबाड संचलित शांतारामभाऊ घोलप कला,विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय,शिवळे येथील आरोग्य विभागाने शुक्रवार दि. 25 जानेवारी 2020 रोजी विद्यार्थीनींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.आपल्या मनोगतात त्यांनी मुलींच्या शारीरिक,मानसिक समस्या व त्यावरील उपाययोजना या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. पाटील यांनी मुलींनी लहानपणापासूनच आरोग्याविषयी जागरुक असावे,स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे,भविष्यात येणार्‍या आजारांना दुर ठेवण्यासाठी संतुलीत आहार घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाच्या प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.जी.आर.विशे यांनी सादर करुन कार्यक्रमाची रुपरेषा व उद्दीष्ट्यो विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वंदना सिंग यांनी तर आभार प्रा. सिमा लिहे यांनी मानले.कु.रिद्धी बाईज हीने ईशस्तवन सादर करुन कार्यक्रमाची गोड सुरुवात केली.
       याप्रसंगी डॉ.मंजुषा घुमारे यांनी सुमारे 100 मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले.या कार्यक्रमाला विद्यामंदिर हायस्कुलच्या 100 मुली व महाविद्यालयाच्या 110 मुली असे एकूण 210 मुली याप्रसंगी उपस्थित होत्या. विद्यार्थीनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य यामुळे सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Post a comment

 
Top