0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |

अस्थी विसर्जन करुन परत येत असलेल्या मालवाहू वाहनांची झाडाला धडक होऊन वाहन दरीत कोसळले. या भीषण अपघातात 8 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना आज सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढोण खुर्द येथे घडली.महादेव बावनकर (53, रा. शेंदुर्जना घाट), किसन कळसकर (55, रा. जोडमोहा), महादेव चंदनकर (58), गणेश चिंचोळकर (52, रा. महागाव), कृष्णा प्रसन्नकर (55), अंजना वानखेडे (69 सर्व रा. जोडमोहा) वाहन चालक अमर आत्राम (32) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.जोडमोहा येथील बाबाराव वानखडे निधन झाले होते. त्यामुळे अपघामधील नागरिक कोटेश्वर देवस्थान येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान, अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे मॅक्झिमो वाहन (एमएच 31 पीक्यू 2774) ने परत येत होते. याचदरम्यान जोडामोहा मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून थेट दरीत कोसळले. या वाहनात एकूण 18 महिला व पुरुष प्रवासी असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

Post a comment

 
Top