web-ads-yml-750x100

Breaking News

ठाण्यातील 8 बोगस डाॅक्टरांवर कारवाई

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
गोरगरीब लोकांची फसवणूक करुन त्यांच्या दवाखान्यात बनावट प्रमाणपत्रे, बोगस पदव्या प्रदर्शित करुन अॅलोपॅथी व आयुर्वेदीक औषधांचा, इंजेक्शनचा, सलाईन उपकरणांचा साठ्यासह मोठया प्रमाणावर अँटिबायोटिक व तत्सम ड्रग्ज देणाऱ्या क्लिनीकच्या बोगस डाक्टरांवर आज महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई आणि ठाणे शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत एकूण ८ बोगस क्लिनीकवर छापा टाकण्यात आला आहे.यावेळी रुग्णांना घातक औषधे देताना बोगस डाॅक्टरांना  रंगेहाथ पकडण्यात आले आहे.पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे कार्यालयात " कळवा विभागामध्ये वैद्यकिय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर यांचेवर कारवाई करणेबाबत" तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. सुरेश मेखला, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त श्री.दिपक देवराज, मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री.किसन गवळी (गुन्हे शोध-1) व मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री.एन.टी.कदम (गुन्हे शोध-2) यांनी वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन करुन महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई चे अध्यक्ष श्री. डॉ.आशुतोष सतीश गुप्ता यांचेशी पत्रव्यवहार करुन बोगस वैद्यकिय व्यवसायी यांचे क्लीनिकवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. दि. 06 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई या परिषदेचे दिनांक 06/02/2020 रोजी महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई या परिषदेचे अध्यक्ष श्री. डॉ.आशुतोष सतीश गुप्ता, प्रबंधक डॉ. दिलीप उत्तमराव वांगे, सदस्य डॉ.बाळासाहेब एकनाथ हरपळे, तसेच कर्मचारी रमेश गणपत पांचाळ, मनोज पंडीत बढे हे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कार्यालयात बोगस वैद्यकिय व्यवसायी यांचेवर कारवाई करण्याकरीता. हजर झाले होते.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर व कळवा पोलीस ठाणे यांचे संयुक्त छापा कारवाईत कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई चे पदाधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने कळवा भास्करनगर व वाघोबानगर येथील 08 बोगस वैद्यकिय व्यवसायी यांचे क्लीनिकवर छापा कारवाई करण्यात आली. छापा कारवाई दरम्यान 1) आलोक सुभाषचंद्र सिंह वय 39; वर्षे 2) रामजित कंचन गौतम वय 47 वर्षे 3) गोपाल बाबु बिश्वास वय 47 वर्षे 4) रामतेज मोहन प्रसाद वय 50 वर्षे 5) सुभाषचंद्र राजाराम यादव वय 47 वर्षे 6) जयप्रकाश लालजी विश्वकर्मा वय 40 वर्षे 7) दिपक बाबु विश्वास वय 48 वर्षे 8) सत्यनारायण लालमन बिंन्द वय 42 वर्षे यांनी स्वतःच्या फायदयासाठी गोरगरीब लोकांची फसवणूक करुन त्यांच्या दवाखान्यात बनावट प्रमाणपत्रे, बोगस पदव्या प्रदर्शित करुन अॅलोपॅथी व आयुर्वेदीक औषधांचा, इंजेक्शनचा, सलाईन उपकरणे इ.चा साठा याचेसह मोठया प्रमाणात अँटिबायोटिक व तत्सम ड्रग्ज प्रत्यक्ष रुग्णांना देताना रंगेहाथ मिळून आले.   
   सदरबाबत कळवा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे गुन्हा रजि. नं. 56/2020 भा.दं.वि.कलम 419, 420, 468, 471 सह महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायी कायदा कलम 34, 36 व 38 प्रमाणे कौन्सील ऑफ इंडीयन मेडिसिन, मुंबई यांचेकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. नमुद कारवाई  पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. सुरेश मेखला, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त श्री.दिपक देवराज, मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री.किसन गवळी (गुन्हे शोध-1) व मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री.एन.टी.कदम (गुन्हे शोध-2) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल होनराव, पो.उप.निरी. विठ्ठल चिंतामण, सपोउपनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/शरद तावडे, सपोउपनि/गोविंद सावंत, पो.हवा/507 इश्वर बुकाणे, पो.हवा/5250 संदीप शिर्के, पो.हवा./3610 लक्ष्मण व्हदलुरे, पो.ना./1958 जयकर जाधव, पो.शि./6894 जितेंद्र खलाटे, पो.शि./6062 रोहन म्हात्रे, म.पो.शि./7859 सविता भुजबळ, चापोशि/893 किशोर जगताप खंडणी विरोधी पथकाचे पो.हवा./887 कल्याण ढोकणे, पो.शि./8205 उमेश जाधव, मालमत्ता गुन्हे शोध कक्षाचे सपोउपनि/सोपान पाटील, पो.हवा/20 5 3 दत्तात्रय कटकोंड, मपोशि/8118 सुवर्णा जाधव कळवा पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. एस.ए.यादव, पो.हवा./2375 आर.एच.संदाशिव, पोना/6558 एन.एस.थोरात, पोना./3230 ओ.बी.चौरे पो.शि./7829 यु.एम.ठाकरे यांनी केली आहे.

No comments