0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाडच्या मातीतील गरिब घराण्यातील एका शेतकर्‍याच्या मुलाने जे करून दाखवलं ते महाराष्ट्रात ते कोणीच केलं नसेल असे आज म्हणता येर्इल.गरिबीतून शिक्षण घेत गरिबाची जाण असलेल्या आणि शिक्षक क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात वडिलांचा वारसा पुढे घेऊन समाजातील प्रत्येक घटकांत गरिब विद्दयार्थ्याला शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोण समोर ठेऊन त्यांना शिक्षणाचा दर्जा उपलब्ध करून मुरबाडमध्ये पहिलीच शाळा काढली जिला आय.एस.ओ नामांकित करण्यात आले.विद्दयार्थ्यांना कमी फि मध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विद्दयार्थी घडविण्याचे महान कार्य खर्‍या अर्थाने  ऋणानुबंध सामाजिक संस्था मुरबाड तसेच रेनबो सनरार्इज इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्राचार्य श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले यांंनी केले आहे.या शाळेत सर्व प्रकारच्या विद्दयार्थ्यांना विविध क्षेत्रातून प्राविण्य मिळवणार्‍या अ‍ॅक्टीव्हिटी उपलब्ध करून दिल्या आहेत.शाळेत प्रवेश करतानाच शाळा ही तालुक्यातून एकच आहे असेच दिसून आले आहे.
या शाळेत दरवर्षी विद्दयार्थ्यांंसाठी विविध स्पर्धा,कार्यक्रम,उपक्रम,फेस्टिव्हल राबविण्यात येत असतात.यंदाच्या 2020 नव्या वर्षीही आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे.ऋणाणुबंध सामाजिक संस्था आयोजित रेनबो सनरार्इज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रेनबो फेस्टिव्हल साजरा करण्यात आला.या फेस्टिव्हल कार्यक्रमात मोठया प्रमाणात विद्दयार्थ्यांनी सहभाग घेत देशभक्ती,सांस्कृतिक नृत्य सादर करत महान थोर विरांचे पोवाडे सादर केले.या फेस्टिव्हलचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यात विविध  क्षेत्रातून अत्यंत चांगले काम केले अशा राजकीय,शैक्षिणिक,कला,आरोग्य,संरक्षण,पत्रकार व अन्य क्षेत्रातील मान्यवरांना व्यासपिठावर एकत्र आणून " सन्मान मुरबाडच्या मातीचा " पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी सत्कारमुर्ती म्हणून श्रीकांत धुमाळ,यशवंत माळी,एकनाथ देसले,जयवंत तुपे,कुणाल शेलार यांना मुरबाड भुषण पुरस्काराने सन्मानित केले.आजपर्यंत असा उपक्रम कधी एैकायला व पाहायला मिळाला नाही असा उपक्रम.ऋणानुबंध सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सनरार्इज इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांनी केला आयोजित केला होता.दरवर्षी रेनबो फेस्टिव्हलमध्ये चित्रपट सृष्टितील कलाकार,हास्यविनोदाचे बादशाहा प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जुन उपस्थित असतात.अशा विश्‍वभरारी भरारी घेणार्‍या आणि जिद्द,चिकाटी,आत्मविश्‍वास मनात बाळगून कोणतीही अपेक्षा न करता मुरबाडचे नावलौकिक व्हावे या विचाराने आज तालुक्यातून संपुर्ण महाराष्ट्रात ज्यांनी रेनबो सनरार्इज शाळेचे नाव गाजविले अशा शेतकरी घराण्यात जन्मलेल्या  श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले यांच्या कार्याची प्रशंसा सर्व स्तरातून करण्यात येत असून या शाळेतील विद्दयार्थी पुर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडेल तो नक्कीच घडेल हे यात शंकाच नाही.ऋणानुबंध सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सनरार्इज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालेल्या फेस्टिव्हलमध्ये प्राचार्य श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांनी विविध मान्यवरांना व्यासपिठावर सन्मानित करून त्यांना गौरविले त्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांचे आभार मानले.त्यांच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक,कर्मचारी वर्गांचे सहकार्य यावेळी मोलाचे लाभले.यावेळी विद्दयार्थी यांच्यासह पालकांनी मोठया प्रमाणात आपली उपस्थिती दाखवल्याने या रेनबो फेस्टिव्हल ला शोभा प्राप्त झाली.

Post a comment

 
Top