web-ads-yml-750x100

Breaking News

" उत्सव शिवजयंतीचा,उत्सव माझ्या राजाचा " कार्यक्रम सोहळयाचे आयोजन ; बहरून निघतोय आतकोली गाव,प्रतिक्षा 19 फेब्रुवारीची…

BY – नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा  |
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठया थाटात महाराष्ट्राचे अराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भिवंडी तालुक्यातील आतकोली गावात साजरी करण्यात येणार आहे.उत्सव शिवजयंतीचा उत्सव माझ्या राजाचा कार्यक्रम सोहळयानिमित्त येत्या 19 फेब्रुवारी 2020 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 9 वाजता शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करून होणार असून सकाळी ठिक 11 ते 1 वेळेच्या कालावधीत महिलांसाठी संगीत खुर्ची,बकेट बॉल स्पर्धेबरोबर शालेय विद्दयार्थ्यांसाठी चित्रकला,दुपारी 2 वाजेच्या सुमारास रांगोळी स्पर्धा व किल्ले स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये घरासमोरील काढलेल्या रांगोळीचे व बनविण्यात आलेल्या किल्ल्यांचे परिक्षण करून विजेतत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे विशेष म्हणजे विजयी महिलांसाठी विशेष स्पर्धा घेतली जाणार असून यामुख्य स्पर्धेमध्ये जी महिला विजय संपादन करेल ती विजेता महिला पैठणीची मानकरी असणार आहे.
तद्नंतर सायंकाळी ठिक 4 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळयांची वेशभुषा साकारून,लहान मावळयांच्या लेझिम पथकांबरोबर संपुर्ण गावातुन वाजत गाजत पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.त्याचबरोबर रात्री 8 ते 9.30 वाजेपर्यंत नियोजित प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्यानंतर ठिक 9.30 चा.श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र व्याख्यान व्याख्यानकर्ते रमेश पालवी (बासे) हे सादर करणार असून या शिवचरित्र व्याख्याने नंतर रात्री 10 वाजता विजयी स्पर्धकांना बक्षिसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आतकोली ग्रामस्थ मंडळानी आमच्याशी बोलतांना दिली.उत्सव शिवजयंतीचा उत्सव माझ्या राजाचा या सोहळयाचे आयोजन सालाबादप्रमाणे यंदाही आतकोली ग्रामस्थ मंडळांनी केले आहेत.   

No comments