0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून सहभागी झालेल्या 16 मंत्र्यांची आज बैठक होणार आहे. मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता पवार मंत्र्यांशी चर्चा करतील. या बैठकीत नेमकं काय घडणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.शरद पवार 16 मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार असल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,  राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील हे बारा कॅबिनेट मंत्री आहेत. तर दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे हे चौघे राज्यमंत्री आहेत.

Post a comment

 
Top