0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |

राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त कल्याणच्या सुभाष मैदान या ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कल्याणमधील विविध शाळांचे 10 हजार 622 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे 101 वर्षांच्या आजी लक्ष्मीबाई दामले या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांसोबत या आजीबाईंनी देखील सूर्यनमस्कार घातले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, महिला बालकल्याण समिती आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केडीएमसी महापौर,महिला बालकल्याण समितीचे सभापती हे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

Post a comment

 
Top