0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
देवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने बदलापूर येथे  ११ एकर जागेत देवसेवा नगरीतुन महाराष्ट्रातील एकमेव देवसेवा आश्रमची स्थापना करण्यात येणार असून संस्थेच्या वतीने बदलापूर येथे सामान्य व्यक्तीस आपल्या स्वतःच्या मालकीचे हक्काचे कमीतकमी दरात घर व्हावे याच उद्देशाने ना नफा ना तोटा अंतर्गत उपक्रम राबवून देवसेवा नगरीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये एन.ए. प्लॉट, फार्म हाऊस, ओपन बंगलो प्लॉट, प्रत्येकाच्या बजेट नुसार लाईट, पाणी, रोड, कंपाउंड, मंदिर, सार्वजनिक हॉल, गार्डन, पार्किंग, सिक्युरिटी व संपूर्ण प्रोजेक्टला सीसीटीव्ही व कंपाउंड सहित सर्व सुविधानियुक्त असे जागा, प्लॉट व घरांचे, बंगलोचे कन्स्ट्रक्शन कमीतकमी दरात करून दिले जाणार आहे तेव्हा संस्थेचे अध्यक्ष श्री.देविदास सोनवणे ९९७५८४१९७३ व कार्याध्यक्ष श्री.नितीन बोराडे ८६०५२८४९१० यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाबाबत व ओपन बंगलो प्लॉट बुकिंग बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आवाहन करण्यांत येत आहे. यामागील मुख्य हेतु हाच की या देवसेवा नगरीतुन जे काही घरासाठी , या बंगलो साठी जागा, प्लॉट विकले जातील त्यातून मिळणारा पैसा महाराष्ट्रातील एकमेव अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम व कलाश्रम या चारही आश्रमच्या एकत्रित  उभारणीस खर्च करण्यात येणार आहे
या कार्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष : श्री.देविदास सोनवणे, उपाध्यक्षा सौ.दीपाली सोनवणे, कार्याध्यक्ष श्री.नितीन बोराडे, उपकार्याध्यक्ष श्री.अरुण भोईर, सचिव सौ.स्मिता त्रिमुखे, खजिनदार सौ.वर्षा सरकटे, सल्लागार श्री.शहाजी जाधव, व्यवस्थापक श्री.अनिल सोनवणे तसेच इतरही सर्व पदाधिकारी, सभासद यांच्या सहकार्याने देवसेवा आश्रमची स्थापना व उभारणी करण्यात आली असे माहीतीपत्रकात सांगितले आहे.

Post a comment

 
Top