web-ads-yml-750x100

Breaking News

मुलीच्या जन्माचे असे ही स्वागत...!

BY – संदीप शुक्ला,युवा महाराष्ट्र लाइव – बुलढाणा |
घरी मुलीचा जन्म झाला तर ज्येष्ठ लोक नाक मुरडतात. मुलगा पाहिजे होता. मुलगा वंशाचा दिवा असतो, असे सांगून आता पेढे नको तर चिलेबी वाट असे म्हणतात. आजच्या मुलीच खरा आधार असल्याचे अनेकांनी अजूनही समजून न घेतल्याने ते असे वागातात. मात्र, यवतमाळातील श्‍यामकुवर कुटुंबीय याला अपवाद ठरले. अजूनही मुलगी नको, मुलगा हवा, हा अट्टाहास पांढरपेशा समाजात कायम आहे. अशा व्यक्तींना कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून नवीन आदर्श घालून दिला आहे.
"कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा' या ओळी आपोआप ओठावर येण्यामागील निमित्त ठरले श्‍यामकुवर कुटुंबीय. रुग्णालयातून नुकत्याच जन्मलेल्या कन्येला सुटी मिळाल्यानंतर वाजत, गाजत, फुलांनी सजविलेल्या कारने घरी आणले. तसेच गुलाबांच्या पाखळ्यांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. याद्वारे "बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा संदेशही देण्यात आला.
संवेदनशील कवी म्हणून कपिल श्‍यामकुवर यांची ओळख आहे. समाजातील वाईट रूढी, परंपरा, अंधश्रद्घा बघून नेहमीच त्यांचे हृदय द्रवते. आपण समाजाचे देणं लागतो, हे ऋण फेडण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. याच श्‍यामकुंवर कुटुंबात बुधवारी (ता. सात) गोंडस कन्यारत्नाने जन्म घेतला. हा हर्ष मावेनासा झाला. रुग्णालयातून सुटी मिळाल्यांनतर डॉ. अभय बेलसरे, कर्मचाऱ्यांनी फुलांनी सजविलेल्या वाहनातून कन्यारत्नाला निरोप दिला.
घरी "बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा संदेश रांगोळीतून देण्यात आला. वाजत, गाजत फुल व फुग्यांनी सजविलेल्या घरात कन्यारत्नाचे आगमण झाले. केक कापून जमलेल्या गोतावळ्याचे तोंड गोड करण्यात आले. अजूनही मुलगी नको, मुलगा हवा, हा अट्टाहास पांढरपेशा समाजात कायम आहे. अशा व्यक्तींना कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून नवीन आदर्श घालून दिला आहे.

No comments