0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
चांगले कर्म, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे. सामाजिक जीवनात काम करताना प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. ठाणे येथील आर. जे. ठाकुर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशन आयोजित पाचव्या  वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते.
यावेळी चंद परिवार फाउंडेशनचे  नॅशनल कमिटी अध्यक्ष दिबी चंद ,उपाध्यक्ष प्रकाश राजन,महासचिव महेश रजवाल,केंद्रीय कोषागार अध्यक्ष नवीन चंद ठाकुर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  म्हणाले, चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खूप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये करीत  आहेत. त्यांनी त्यांचे हे कार्य असेच पुढे  चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी बोलायला शिकले पाहिजे.
 परिवार फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट   काम केल्याबद्दल सुरेश राणाजी,बिरेंद्र नेगी,डॉ.दिनेश चंद यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या  हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इसिता कासवाणी यांनी केले.

Post a comment

 
Top