web-ads-yml-750x100

Breaking News

कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई ।
कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी येथे केले.
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे श्री. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा 2019-20 या वर्षातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळासांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने  आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची पार्श्वभूमी विशद करुन श्री.देशमुख म्हणालेकलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना मुंबईसह महाराष्ट्राने प्रोत्साहन व प्रेम दिले आहे. हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या गुणांना वाव देऊन राज्याने नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. कलाक्षेत्रात काम करताना कलाकारांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याकडे तसेच कलाक्षेत्राला वाव देण्याकडे राज्य सरकारचा कल असून सांस्कृतिक क्षेत्रात अधिक प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येईलअसेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

No comments