0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद  |
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रसिध्द मराठी साहित्यिक,गीतकार,संगीतकार, कथा पटकथा लेखक तथा भारतीय पत्रकार संघटनेचे तालुकाअध्यक्ष योगेश तुळशीराम मोरे यांनी शिवभक्त सिनेअभिनेते सचिन गवळी यांची शिर्डी येथे भेट घेतली. सिनेअभिनेते सचिन गवळी यांनी नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या "फत्तेशिकस्त" आणि "जवानी जिंदाबाद" या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेली आहे.
तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित ८० पेक्षा जास्त शॉर्ट फिल्मस....बनवून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करून आजच्या युवा पीढीला आदर्श घालून दिला आहे आणि स्वतःचा एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे.तसेच सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक योगेश तू. मोरे यांनी लिहिलेल्या "भरकटलेल्या पक्ष्याचा किलबिलाट"व "द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड" या कादंबरीला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळालेला असून,"द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड"ही कादंबरी वाचकांच्या सोयीसाठी अमेझॉनवरदेखील उपलब्ध करून दिलेली असून,या दोनही कादंबरीवर आधारित लवकरच एक धमाल विनोदी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून,यामध्ये देखील सिनेअभिनेते 'सचिन गवळी' यांचा अभिनय असणार आहे.तसेच हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास शिवभक्त अभिनेते सचिन गवळी यांनी व्यक्त केला.आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात या मराठी चित्रपटासाठी ऑडिशन देखील होणार असून, तसेच ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना यात संधी देण्यात येणार आहे.

Post a comment

 
Top