web-ads-yml-750x100

Breaking News

सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल तसेच मुंबर्इ विद्दयापीठ यांच्या संयुक्त विद्दयमाने एक दिवसीय ग्रामपंचायत कार्यशाळा संपन्न

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |
25 जानेवारी 2020 रोजी पनवेल येथिल शेडूंग गावाजवळील नामांकित सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय तसेच मुंबर्इ विद्दयापीठ यांच्या संयुक्त विद्दयमाने ग्राहक पंचायत संबंधी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दिपप्रज्वलनाने सुरूवात करित या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उदघाटन व्यासपिठावरील विराजमान झालेले मुंबर्इ विद्दयापीठाचे विधी विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय जाधव सर,अ‍ॅड.चंद्रकांत  निकम,सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे सर,विद्दयासागर उबाळे,डॉ.पद्मजा डांगे,प्रा.अभिजित जाधव,प्रा.अरविंद दौंड,अ‍ॅड.प्रिती चमैयकुतै यांच्या शुभहस्ते करून पुढिल कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमास व्यासपिठावरील प्रमुख अतिथी मान्यवरांनी विद्दयार्थ्यांशी संवाद साधत ग्राहकांच्या विविध हक्कांसंदर्भात चर्चा करून कशा पध्दतीने करार करायला हवा व कोणतीही वस्तु खरेदी केल्यास त्याचे पक्के बिल घेण्यासंदर्भात विविध अतिथींनी मार्गदर्शन केले.
या महत्वपुर्ण चर्चेत कोणतेही बिल असल्यास त्या बिलावर टोन नंबर असणे अवश्यक असल्याचे मार्गदर्शनही यावेळी करून ग्राहकांनी जागृत राहण्यासंबधी सुचना दिल्या.वकिली करणार्‍या विद्दयार्थ्यांना मोलाचा सल्ला देत कायदा सुव्यवस्थेचे पालन करून कशा पध्दतीने त्या कायद्दयाचे मान राखले पाहिजे असे प्रमुख  मार्गदर्शन यावेळी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे प्राचार्य मा.डॉ.मृत्युंजय पांडे सरांनी केले.वकिल हा न्याय मिळवून देण्यासाठी असतो अशा प्रत्येक न्यायाची बाजू कशी न्यायालयात मांडली जावी व एक प्रतिष्ठित वकिल समाजात कसे व्हाल आणि कशा पध्दतीने केस लढाल असे संवाद साधत विद्दयर्थ्यांशी चर्चाही यावेळी करतांना विविध उदाहरणाने समोर मांडले.विद्दयार्थ्यांनीा प्रश्‍नावली मांडत मान्यवरांनी त्यांच्या प्रश्‍नावर उत्तरे देत त्यांना सल्ला देत विद्दयार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निरासरण केले.
या कार्यक्रमात विद्दयार्थ्यांनी मोठया प्रमाणात सिंहाचा वाटा उचलून आपला सहभाग घेऊन या कार्यशाळेची शोभा वाढविली.या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सुभाष सोनकर सर,प्रा.ललित पगारे,प्रा.अभिनव दुबे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार महाविद्दयालयाचे विद्दयार्थी योगेश पवार यांनी मानले.

No comments