web-ads-yml-750x100

Breaking News

महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदिश पाटील यांच्या वाढदिवसावर लाखो चाहत्यांनी वर्षावला शुभेच्छांचा वर्षाव

BY - नामदेव  शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
महाराष्ट्रात  नामवंत म्हणून गायक म्हणून ज्यांची ओळख आहे असे जगदिश पाटील यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला.प्रमुख म्हणजे या वाढदिवसालाही दरवर्षी प्रमाणे शिर्डीचे सार्इबाबा चरणी मस्तक ठेवून त्यांच्या आशिर्वादाने नविन वर्षाची सुरूवात व वाढदिवसाचे औचित्य साधत समस्त शिर्डीतील चाहते,नागरिक आणि मुख्यतः येथिल भिक्षा घेणारे गोरगरिबांच्यासमवेत हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला.सार्इबाबांची कृपा आशिर्वादाने आणि नागरिकांच्या सहकार्याने आपल्या जीवनातील यशाला महत्व देणारे गायक जगदिश पाटील यांना संपुर्ण महाराष्ट्रातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव वर्षावला आहे.गायक म्हणून त्यांची ख्याती संपुर्ण जगाला ज्ञात आहे.त्यांची हजारो लोकगीत,कोळीगीत,भावगीत,मधूरगीत,सार्इगीत प्रसिध्द असताना त्यांना महाराष्ट्राचा उत्कृष्ठ गायक असा पुरस्कार मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते देण्यात आला.त्यांची ओळख नावानी नसून गायक म्हणून गोड वाणीची आहे त्यामुळे जेथे सार्इमाऊली तेथे  जगदिश पाटील हे नाव आवर्जुन एैकायला मिळत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक गायक झाले.नेहमी चांगली सदबुध्दी मिळावी म्हणून सार्इचरणी असलेली इच्छा नेहमी दादांची पुर्ण झाली आहे.जगदिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुरबाड तालुक्याचा मिमिक्री मॅन म्हणून गणेश देसले यांची ओळख महाराष्ट्रात आहे.असे नामवंत गायक जगदिशदादा पाटील यांना मुरबाड विकासमंच ट्रस्ट,स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी परिवाराकडून पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments