0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी |
गेल्या काही वर्षापासून भिवंडी  तालुक्यातील आतकोली,भादाणे,आवळेवाटे अशा अन्य ठिकाणीच्या जागेवर बेकायदेशीर खाणकाम सरू असल्याची तक्रार करण्यात आली होती.परंतू कारवार्इ अद्दयाप झाली नाही.बेकायदेशीर दगड,डबर,माती उत्खनन करत असून भिवंडी तालुक्यात 22 जागेवर खाणकाम सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहेत.सदर खाणकामाची खाणपट्टीची मुदत संपली असूनही बेकायदेशीर खदाण्यांकडे भिवंडी तहसिलदारांनी कारवार्इ करण्यास कानाडोळा केला आहे.
संबंधितांवर योग्य ती कारवार्इ न करता मोठया प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे.आतकोली,आवळेवाटे येथे बेकायदेशीर खाणकाम मोठया प्रमाणात करून अधिकार्‍यांच्या संगणमतांने हा विषय दाबण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीवरून आवळवाटेच्या जागेतील खाणकामाची 01/07/2019 रोजी मुदत संपली असतानाही मोठया प्रमाणात खोदकाम करून अधिकार्‍याला दाबून चोरी चोरी चुपके चुपके करत आहे.याची परिपूर्ण माहिती भिवंडी तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांचे कार्यातील संबंधित अधिकार्‍यांना माहिती असूनही कारवार्इ करण्यात आली नाही.सदरची जागा ही खाजगी असल्याचेही कळून येत असून 5 वर्षाच्या मुदतीला 6 व्या वर्षात पदार्पण होऊनही शासनाची दिशाभुल करून बेकायदेशीरपणे खाणकाम करणार्‍याला  अधिकारी वर्ग मात्र पाठिशी घालत आहे.याकडे भिवंडी तहसिलदार यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले की,माहिती नसल्याचे ढोंग घेत आहे असा प्रश्‍न येथिल सामाजिक संघटनांनी केला विचारला आहे.कित्येक प्रकरणे शासन दफ्तरी असून परवनागीसाठी कागदपत्रे अपुरे लावले आहेत.असे कित्येक खदाणी बेकायदेशीर चालू असून माहिती अधिकाराखाली  माहिती दिली जात नाही त्यातच  भिवंडी तहसिलदारांच्या अम्तर्गत सदर बाब असतांना त्यांना अद्दयाप लक्षात का नाही आली ? असा प्रश्‍न मात्र येथिल जनतेला पडला आहे.बेकायदेशीर खोदकाम करून शासनाच्या कराला बुडवणार्‍या मालक,ठेकेदार व असक्षम म्हणून दुर्लक्षतेची भुमिका साकारणार्‍या अधिकार्‍यावर जिल्हाधिकारी काय कारवार्इ करणार याकडे लक्ष लागून आहे.

Post a comment

 
Top