0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्‍यस्तरीय चित्ररथाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे करण्यात आले. हा चित्ररथ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरणार असून, आजपासून त्याचा शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देण्यात येणार आहे. एका दिवशी संबंधित ५ गावात हा चित्ररथ जाणार आहे. 
या चित्ररथावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, विविध शिष्यवृत्ती  योजना यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व ध्वनीक्षेपण यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, सहायक आयुक्त,  समाजकल्याण सचिन मडावी यासह विविध मान्यवर, सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top