web-ads-yml-750x100

Breaking News

कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कथोरे यांचे कामगार आयुक्तांना पत्र

BY – नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,भिवंडी |
भिवंडी तालुक्यातील वाहुली येथे मुंबर्इ नाशिक महामार्गालगत गोरेफेर्स प्रा.लि या कपंनीत येथिल परीसरातील काही 80 मराठी तरूण 2016 पासून कामगार म्हणून काम करत होते.हि कंपनी वाहुली वरून डोहळे येथे स्थलांतरित झाली असल्याने कंपनी व्यवस्थापकांनी त्या तरूणांना डोहळे येथिल कंपनीत कामावर तसेच विश्‍वासात न घेता व त्या 80 तरूणांना कोणत्याही प्रकारे नोटीसी,समज न देता कायमस्वरूपी कामावरून अचानक काढले आहे.त्या गरजू तरूणांवर व त्यांच्या विसंबून असलेल्या कुटूंबावर उपासमारिची वेळ आली आहे.70 युवक तरूणांचा आकडा जरी छोटा मानला जात असला तरी कुटूंबाचा आकडा हा मोठाच आहे याची दक्षता लक्षात घेता सर्व तरूण कामगार युवकांनी भारिप बहुजन महासंघाचे भिवंडी तलुकाध्यक्ष योगेश कथोरे यांचेकडे न्याय मागण्यासाठी आपले पाऊल टाकले आहे.तरूणांच्या गळयातील समाजसेवक म्हणून गळयातील तावीत अशी ओळख योगेश कथोरे यांची असून त्यांनी तात्काळ तरूणांच्या कंपनी व्यवस्थापकाशी संपर्क साधला परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभुल करण्याचा उच्चांक गाठला.आज त्या कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता भारिप बहुजन महासंघाचे भिवंडी तालुकाध्यक्ष योगेश कथोरे यांनी आवर्जुन लक्ष घातले आहे.तरूणांना पुन्हा त्याच कंपनीत कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापकाला समज देण्यासाठी कामगार आयुक्त यांना निवेदणाद्वारे विनंती केली आहे.

No comments