web-ads-yml-750x100

Breaking News

माहिती व जनसंपर्कच्या महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे रुजू

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ.दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला.श्री. पांढरपट्टे यांची 1987 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000 मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 27 मार्च 2015 साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा समावेश 2004 च्या बॅचमध्ये करण्यात आला.श्री. पांढरपट्टे यांनी 1981 मध्ये बी.एस्सी., 1983 मध्ये बी.एड्., 2005 मध्ये एल.एल.बी., 2008 मध्ये एल.एल.एम., 2014 मध्ये एम.बी.ए. आणि 2017 मध्ये  पीएच्.डी याप्रमाणे पदव्या प्राप्त केल्या आहेत.
श्री. पांढरपट्टे यांचे वेगवेगळ्या पदावर काम : - डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी 1989-उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी (सिंधुदुर्ग), 1989-91 - उपविभागीय अधिकारी, दापोली (रत्नागिरी), 1991-92 -जिल्हा पुनर्वसन अधिकारी,रायगड, 1992-96- उपविभागीय अधिकारी, माणगांव, रायगड, 1996-97 - सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष (कोकण विभाग), 1997-2000- निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड, 2000-2001 - प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशी (कोकण विभाग), 2001-2004 - उपायुक्त, ठाणे महानगरपालिका, 2004-2005- उपसचिव (सांस्कृतिक कार्य विभाग), 2005-2006-उपायुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, 2008-2011 - अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, 2011-2013 - अध्यक्ष,जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (कोकण विभाग/रत्नागिरी), 2013-2015-मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, 2015-ऑगस्ट 2016 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड, 11 ऑगस्ट 2016 ते 20 एप्रिल, 2018 जिल्हाधिकारी, धुळे, 07 मे, 2018 पासून जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग म्हणून 20 जानेवारी 2020 पर्यंत ते कार्यरत होते.

- : वाङ्मयीन कामगिरी : - 
प्रशासकीय सेवा बजावताना श्री. पांढरपट्टे यांनी आपल्या वाङ्मयीन व साहित्यिक सर्जनशीलतेला कायम फुलवीत ठेवले. त्यांची साहित्यसंपदा  पुढीलप्रमाणे आहे.
•      'घर वाऱ्याचे, पाय पाऱ्याचे' (ललित लेखसंग्रह तीन पुरस्कार)
•      'कथा नसलेल्या कथा' (कथासंग्रह)
•      'बच्चा लोग ताली बजाव' (विनोदी लेखसंग्रह)
•      'शायरी नुसतीच नाही' (उर्दू शायर आणि शायरीचा परिचय)
•      'शब्द झाले सप्तरंगी' (मराठी गजल संग्रह) चार आवृत्या
•      सव्वाशे बोधकथा भाग-1 (बोधकथा संग्रह) दोन आवृत्या
•      सव्वाशे बोधकथा भाग-2 (बोधकथा संग्रह)
•      डॉ.राम पंडित संपादित 'मराठी गजल
•      'राहील त्याचे घर' (कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत)
साहित्यिक उपक्रम :
•      गजल तसेच अन्य विषयांवरील व्याख्यानांचे महाराष्ट्रभर व राज्याबाहेर अनेक कार्यक्रम.
•      गजल/गीतांच्या सी.डी. प्रकाशित (मराठी व उर्दू).
•      दैनिक सकाळ (मुंबई) मध्ये बोधकथा या सदरातून पाचशे बोधकथा प्रसिद्ध.
•      आकाशवाणी /दूरदर्शन मधून कविता व गद्य लेखन.
•      उर्दू भाषा व लिपी शिकून उर्दू मध्ये 'रिंद' या  नावाने गजल लेखन.

•      'शब्द झाले सप्तरंगी' व 'गजल- रेगिस्तान से हिंदुस्तान तक' तसेच 'गालिब और मैं' या कार्यक्रमांतून गजल सादरीकरण.

No comments