BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रोडपाली येथील सेक्टर 16 येथील डिम्पी ओरिजेन या इमारतीमध्ये
तिसर्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे सर्व इमारत हादरली. या सोबतच परिसरात
घबराट निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी
झालेली नाही. मात्र दोन महिला किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
डी मार्ट ते नवी मुंबई
पोलीस मुख्यालय रोडवर सेक्टर 16 येथे कृष्णा बार अँड रेस्टॉरंट समोर भूखंड क्रमांक
20 येथे डिम्पी ओरिजेन ही इमारत आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास
तिसऱ्या मजल्यावर एका सदनिकेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. त्याचा आवाज इतका मोठा होता
की सेक्टर-16 बरोबरच 15, 14, 17 आणि 20 मध्ये मोठ्या प्रमाणात आवाज आला. याची तीव्रता
इतकी मोठी होती की इमारतीतील सर्व घरांमधील रहिवाशी धावत रस्त्यावर आले.
सिलिंडरच्या स्फोटामुळे
घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे दोन बंब आणि जवान
घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्ध्या तासामध्ये ही आग आटोक्यात आणली. दरम्यान दोन्ही
मार्गांवर बघ्यांची गर्दी जमली होती. कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान
यामध्ये कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. परंतु या दुर्घटनेमुळे कळंबोली परिसर एक प्रकारे
हादरून गेला.
Post a comment