0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सरळगांवग्रामपंचायत संकुलाच्या भष्ट्राचाराला वाचा फोडण्यासाठी कॉ. रमेश गायकवाड व सोमनाथ घुडे यांनी २०१३पासून अनेक आंदोलने, उपोषणे केली होती. त्यांच्या दिनांक२४/०१/२०२० च्या अन्नत्याग उपोषणाचा आज ६ वा दिवस दिनांक २७/०१/२०२०रोजी सरळगांवच्या व्यापारी मंडळ व टपरी चालक यांनी सरळगांव बंद ठेऊन उपोषणकर्त्यांनापाठिंबा दर्शविला होता. उपोषणाच्या स्थळी मा.गटविकास अधिकारी यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी मा.सोनावणे साहेब यांच्या सहीचे पत्राद्वारे ग्रामविकास अधिकारी श्री यशवंत म्हारसे यांना निलंबित करण्यात आले असून उपोषणकर्ते कॉ.रमेश गायकवाड व सोमनाथ घुडे यांच्या उपोषण आंदोलनातील इतर मागण्यांवर कुठल्याही प्रकारचा ठोस कारवाईचे लेखी आश्वासन न दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी अन्नत्याग उपोषण चालूच ठेवले आहे.


Post a comment

 
Top