web-ads-yml-750x100

Breaking News

प्रेक्षकांची मने जिंकणारा सिनेमा उत्तुंग शिखर गाठेल - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
अलीकडच्या काळात चित्रपटांची परिभाषा बदलली आहे.आज सिनेमामध्ये वेगवेगळे प्रयोग होत असून ॲनिमेशनसारख्या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. प्रेक्षकांची मने जिंकणारा सिनेमा येणाऱ्या काळात उत्तुंग शिखर गाठेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
वरळीतीलनेहरु सेंटर येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन अर्थात मिफ्फ 2020 चे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीयपर्यावरण,वने आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री बाबूलसुप्रियो, माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव अतुल कुमार तिवारी, दिग्दर्शक व निर्मात्या उषा देशपांडे, मिफ्फ महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स- शर्मा,माजी नगरपाल किरण शांताराम, आदिती अमित देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी श्री.देशमुख म्हणाले, फिल्म्स डिव्हिजन आयोजित 'मिफ्फ' हे भारतातील (माहितीपट) डॉक्युमेंटरी फिल्म चळवळीची परिभाषा मांडणारे महत्त्वपूर्ण आणिसशक्त अंग आहे. या माध्यमातून अनेक सृजनशील तरुणांचे चित्रपट निर्मितीचे स्वप्न-सत्यात उतरले आहे. मिफ्फचे स्तर आणि आवाहने निरंतर वाढत असले तरी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने पाठबळ मिळाल्यामुळे  हा जगभरातील डॉक्युमेंटरीआणि लघुपटांचा सर्वात प्रतिष्ठित उत्सव बनला आहे. श्री. देशमुखम्हणाले, मिफ्फ हा लघुपटांसाठी प्रेक्षक शोधणारा प्रशंसनीय चित्रपट महोत्सव आहे. आज श्रेणीसुधारित तंत्रज्ञान स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे नवोदित चित्रपट निर्माते आणि कथाकारांना त्यांची कला लघुपट, माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि अ‍ॅनिमेशन चित्रपटांच्या माध्यमातूनछोट्या व्यासपीठावर प्रेक्षकांना दाखविण्यात मदत होते.म्हणूनच, अलिकडच्या काळात विचार करण्यास प्रवृत्त करणारे निर्माते देशभरातूनसमोर येताना दिसतात.ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कलाकारांनादेखील लघुपटांचा सर्वसामान्यांवरील व्याप्ती आणि त्यांचा प्रभाव समजण्यास सुरवात झाली आहे.म्हणूनच या कलाकारांनी छोट्या परंतु अर्थपूर्ण भूमिका स्वीकारण्यास प्रारंभ केला. या कलाकारांमुळे  लघुपट प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.श्याम बेनेगल, नरेश बेदी, माइक पांडे, एम.व्ही.कृष्णस्वामी,के. एल.खंडपूर आणि विजय मुळे यांसारखे काही सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निर्माते भारताने सिनेसृष्टीला दिली आहे.

No comments