BY -
मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
|
शालेय शिक्षण विभागाने यंदा अकरावीचा नवीन अभ्यासक्रम आणला असून
त्यासाठीच्या अध्ययन पद्धतीत अनेक प्रकारचे बदल केले आहेत. या बदलानुसार
अकरावी-बारावीला पर्यावरण विषयासोबतच आरोग्य आणि जल सुरक्षेचा विषय आणला आहे.
मात्र, या विषयांसाठी गुण ऐवजी आता 'ग्रेड' देण्यात येणार आहेत. यात अ, ब, क, ड,
असे चार 'ग्रेड' देण्यात येणार असून यात चौथा 'ड' हा 'ग्रेड' मिळाल्यास विद्यार्थी
नापास ठरणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर सर्व विषय उत्तीर्ण झाले तरी हा
ग्रेड चुकल्यास विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का लागणार आहे.
Post a comment