web-ads-yml-750x100

Breaking News

रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रस्तावित विकासकामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथील निवासस्थानी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.रत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान मधून मागणी केलेल्या निधीबाबत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय मधील समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी श्री. सामंत म्हणाले, रुग्णालयातील रूग्णांना आरोग्य सेवा  उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामधील डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावी. तसेच रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सिटीस्कॅन मशीन लवकरात लवकर सुरू कराव्यात, असेही निर्देश यावेळी श्री. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


No comments