web-ads-yml-750x100

Breaking News

मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात, 'या' देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये 'फिटनेस'चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे 5.15 वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार आहे.


No comments