Breaking News

चंद्रपुरात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

BY – युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर |
दहा वर्षाच्या मुलीला हरियाणात विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दहा वर्षानंतर याचा खुलासा झाल्यानंतर दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी जिल्ह्यातील जवळपास वीस मुलींना विकल्याची धक्कादायक कबूली दिली आहे. तसेच गुरुवारी आणखी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2010 मध्ये जून महिन्यात चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिला हरियाणात विकण्यात आले. यावेळी ती काली मंदिरात खेळत होती. यानंतर मागील दहा वर्षात तिच्यावर अत्याचार करण्यात आले. अल्पवयातच तिने दोन मुलांना जन्म दिला. दीड महिन्यांपूर्वी संबंधित मुलीला पुन्हा दीड लाखांना विकण्यात आले. मात्र, यावेळी हरियाणात पोलिसांनी तिची सुटका केली. रामनगर पोलिसांनी तिला चंद्रपुरात आणले. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी सावित्री रॉय आणि जान्हवी मजूमदार यांना अटक केली आहे. या दोघांनाही १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांनी आतापर्यंत वीसहून अधिक मुलींना विकल्याची कबूली दिली आहे.

No comments