0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळं बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आपल्या पक्षाची नवी भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरणही करण्यात आले आहे. स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेने आता हिदुत्त्वाची कास धरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा केंद्रस्थानी असलेला भगवा झेंड्याचे त्यांनी अनावरण केले आहे.याबरोबरच अनेक महत्वाचे ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा राकारणार प्रवेश होणार असल्याची चर्चा होती ती अखेर खरी ठरली असून अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा मनसेच्य़ा अधिवेशानात करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे यांचा पुढील राकीयक प्रवास कसा राहतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान, संपुर्ण राज्यातुन एकुण 50 हजार पदाधिकारी या राज्यव्यापी अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. तर ठाणे पालघर जिल्ह्यातून 6 हजार मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी राज ठाकरे संपूर्ण मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. आता ते आपल्या पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत.

Post a comment

 
Top