web-ads-yml-750x100

Breaking News

चंद्रपुरातील झी बाजार दुकानाला भीषण आग

BY – युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर |
शहरातील घनदाट वस्तीत असलेल्या संत अन्द्रिया देवालयाजवळच्या झी बाजार या गृहोपयोगी सेल दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बाजार जळून खाक झाला आहे. पहाटे सव्वा तीन वाजता अग्निशमन दलाला यासंबंधीचा पहिला फोन आला. यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या या बाजाराकडे अग्निशमन कार्यासाठी मोर्चा वळवला. सकाळ होईपर्यंत सुमारे पंचवीस अग्नीशमन बंब आग विझविण्यासाठी पोहोचले. मात्र ही आग नेमकी कशी लागली, याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.
शहराच्या मध्यभागी गृहोपयोगी छोट्या वस्तूंचा हा बाजार ओळखला जात होता. 30 वर्षांपासून तो सुरू होता. आगीत सुमारे साडेतीन कोटींचा माल राख झाला असल्याची माहिती बाजार मालकांनी दिली आहे. 30 कर्मचारी येथे कार्यरत होते. पण ते सगळे सुखरूप आहेत. इमारतीतून धूर निघत असल्याचं सुरक्षा रक्षाकच्या निदर्शनास येताच त्यानं कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवलं. त्यामुळं जीवहानी टाळली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आता आग पूर्णपणे विझली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


No comments