BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील सर्व माध्यमांच्या
शाळेत इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
येत्या अधिवेशनात याबाबतचा कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
यांनी दिली.सध्या राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
सद्यस्थितीत राज्यात 25 हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते.
अशा या सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे सक्तीचे केले जाणार आहे. यासंदर्भात कायद्याचा
मसुदा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे
गाव, रंगवैखरी इत्यादी उपक्रम यापुढेही सुरू राहतील. भिलार येथे पुस्तकांचे गाव हा
अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याची व्याप्ती वाढवण्याचा शासन प्रयत्न करील
असे देसाई यांनी स्पष्ट केले.रंगवैखारीः महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ
मिळवून देण्यासाठी रंगवैखरी उपक्रम राबविला जात आहे. सध्या मुंबई, पुण्यामध्ये हा उपक्रम
सुरू असून नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल.
Post a comment