0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह, नवीन प्रशासकीय भवन, वांद्रे (पूर्व) येथे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात आले.या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात,  1 वाटी वरण यांचा समावेश आहे. श्री. ठाकरे यांनी जेवणाच्या थाळीचे प्रातिनिधीक वाटप केले. ही योजना गरजू आणि गरीब यांच्याबरोबर सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.उद्घाटनप्रसंगी खासदार हुसेन दलवाई, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे तसेच शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top