0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड म्हसा रोडलगत आदिवासी शाळेतील एका विद्दयार्थी मुलाचा सकाळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत प्रेत मिळाला आहे.सदर माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस,अ‍ॅम्बुलन्स दाखल झाले.सदर मुलाचे निरगुडा असे नाव समोर आले असून आत्महत्या आहे की हत्या हे अद्दयाप स्पष्ट करण्यात आले नाही.त्याच्या  घरच्यांनी माझ्या मुलाची हत्या केला असल्याचे व्यक्त करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल जो पर्यंत करीत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेण्यात येणार नाही यासाठी मोठया संख्येने अदिवासी बांधवांनी मुरबाड पोलिस ठाण्यासमोर व मुरबाड ग्रामीण रूग्णालयाबाहेर होती.पोलिसांच्या विरोधात सामान्यांचा सुर उमटला आहे.सदर मुलाचे प्रेत हे केर्इएम पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दखल ही बाब सध्या मुरबाडच्या पोलिसांनी गांभिर्यतेने घेतलीच नाही.मुरबाडचे पेालिस सामान्यांची दखल तात्काळ पणे कधी घेतच नाहीत.राजकीय पुढारी ठेकदार पैशेवाल्यांच्या आदेशाने पोलिस चालत असून ग्रामीण पोलिस अधिक्षीक हे सुध्दा प्रत्यक्षात एखाद्दया त्या तक्रारीचे निवराण न करता अन्य प्रकारच्या केसेस दाबण्याचा पोलिसांना बळ देतात.याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष वेधले पाहिजे.कित्येक आत्महत्या होतात त्या आत्महत्यांची आकस्मित  मृत्युंची नोंद होते.तद्नंतर कोणत्याही प्रकारे कारवार्इ होत नाहीत.अवैध धंदे गुटखा,मटका,जुगार सगळया गोष्टी चालू असतात याकडे दुर्लक्ष करत सर्वच पोलिस मोठया प्रमाणात हप्ते घेतात.त्यामुळे पोलिसांची एक दहशत वाढली आहे.भाजपाच्या कालावधीमध्ये पण तेच आणि शिवसेना,राष्ट्रवादी,काँगे्रस यांच्या महाविकास आघाडीच्या काळातही तेच.अशी सामान्य लोक आदिवासी बांधव बोलून दाखवतात.त्याचप्रमाणे मुरबाड आदिवासी शाळकरी मुलाचा मृत्यु झाला ही हत्या आहे.जर नाही तर पोलिसांनी काय तपास केला ? या प्रकरणाचा तपास लागल काय हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे.अशा तरूण विद्दयार्थ्यांच्या आत्महत्यांची चौकशी करण्यासाठी शासनानी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

Post a comment

 
Top