0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
उदगीर आणि कर्जत येथील नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली असून यामुळे रोजगार निर्माण होणार असल्याचे  आदिती तटकरे यांनी सांगितले.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 385 वी बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित केली होती. त्यावेळी कुमारी तटकरे बोलत होत्या.कर्जत येथील एमआयडीसी उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कर्जत येथेही एमआयडीसी उभारणार असल्याने अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनबलगन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top