web-ads-yml-750x100

Breaking News

इतर मागास वर्ग, भटके विमुक्त समाजाचे प्रश्न राज्य शासन मार्गी लावणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील इतर मागास वर्ग, भटके, विमुक्त समाज घटकांच्या प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या रौप्य महात्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.देसाई बोलत होते. यावेळी बंजाराचे समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, जगदीश राठोड यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आवर्जून या मेळाव्यास उपस्थित राहण्याच्या सूचना मला केल्या. ओबीसी, भटक्या, विमुक्ती जाती-जमातीचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी राज्य शासन व मुख्यमंत्री सकारात्मक असून या समाजाच्या समस्या सोडविण्यात येतील.  राज्य शासन ओबीसी, धनगर, भटक्या समाजाच्या पाठीशी सदैव उभे राहिल. 
यावेळी श्री. राठोड, श्री. शेंडगे यांचीही भाषणे झाली. या मेळाव्याला पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील अनेक महिला हजर होत्या.

No comments