Breaking News

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवले, आझाद मैदानात पाठवणार

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाप्रकरणी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सर्व आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. पर्यटकांना त्रास होत असल्याचं सांगत आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच आंदोलनाला परवानगी नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांना आता तिथून हटवण्यात आलं आहे.

No comments