web-ads-yml-750x100

Breaking News

ठाण्यात घोडबंदर टोल नाक्याजवळ बसला आग

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
घोडबंदर टोल नाक्या जवळ टोलनाका क्रास करताच एका बसने पेट घेतला. एका रिक्षावाल्याने घोडबंदर ब्रीजवरून बस जात असताना बसच्या टायरला लागलेली आग पाहिली. तो आरडा ओरडा करुन बस थांबवायला सांगत होता.मात्र,बस ड्राईव्हर ने एकले नाही. रिक्षावाल्यांनी थांबून त्यांच्या जवळच्या रिक्षातील फायर सिलेंडरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. राजस्थान राज्यातील ही बस असून या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती  बसला लागलेली आग विझवण्यात आली असून वाहतूक देखील सुरळीत झाली आहे.

No comments