web-ads-yml-750x100

Breaking News

भोर उपजिल्हा रुग्णालयाचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भोर उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध मागण्यांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज आढावा घेतला.या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने कान, नाक, घसा तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. येथील रक्तपेढीमध्ये तंत्रज्ञाची नियुक्ती करावी. आवश्यक ती साधनसामुग्री देखील उपलब्ध करुन या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा द्याव्यात, असे श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले.
हे उपजिल्हा रुग्णालय 50 ऐवजी 100 खाटांचे करावे, सासवड, भोर, जेजुरी, वेल्हा मुळशी, येथे  डायलेसिस यंत्र उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी खासदार श्रीमती सुळे यांनी यावेळी केली. विभागामार्फत तांत्रिक बाबी पूर्ण करुन पदभरतीनंतर आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव उपस्थित होते.    


No comments