Breaking News

झेप बहुउद्देशी सामाजिक संस्था संलग्न ध्यास समुदाय विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरक्षित गर्भपात आणि गर्भपात कायदा व्याख्यान जनजागृती

BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
झेप बहुउद्देशी सामाजिक संस्था संलग्न ध्यास समुदाय विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने उल्हासनगर मध्ये दिनांक ०३/०१/२०२० रोजी शिक्षणाची जननी माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त पहिल्यांदाच एक आगळा वेगळा विषय सुरक्षित गर्भपात आणि गर्भपात कायदा यावर सम्येक संसाधन केंद्र,पुणे यांच्या मार्फत प्रवीण काळे सर आणि सुशीला पवार मॅडम  याने सुरक्षित गर्भपात म्हणजे काय त्यासाठी असणारे कायदे कोणते या विषयावर महिलांना माहिती दिली व जनजागृती केली.
महिलांनेहि सदर व्याख्यान मध्ये सहभाग घेऊन आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या.कार्यक्रमाचे आयोजक विकास आप्पा भालेराव,राजेश उत्तम पेठारे,संतोष कोळी, चंद्रशेखर पंडागळे,कविता राकेश निकम,रुपाली कदम,प्रिया गायकवाड पेठारे यांनी केले होते.

No comments