0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह । नाशिक 
अहमदनगर जिल्ह्याच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण केली जातीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी अहमदनगर जिल्हा आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरातकृषीमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय महेताप्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त राजाराम माने,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर तांबेलहू कानडेआशुतोष काळेडॉ. किरण लहामटेश्रीमती मोनिका राजळे आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top