web-ads-yml-750x100

Breaking News

उल्हासनगरमध्ये केली सार्इबाबा मुर्तीची स्थापना

BY – युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर - 04 येथिल कुर्ला कॅम्प येथे सार्इ संस्थान मित्र मंडळाच्या वतीने सार्इबाबा मुर्तीची स्थापना 15/01/2020 रोजी करण्यात आली.यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पाहुणे तसेच सार्इ संस्थान मंडळांच्या पदाधिकारी यांचे प्रेरणास्थान असलेल्या भिकनराव सोमवंशी,भाउसाहेब सुरवसे,समाजसेवक मुकूंदा जाधव यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष समीर सुरवसे,उपाध्यक्ष अमित सोमवंशी,खजिनदार धनंजय कशिद,सचिव डॉ.भुषण कोल्हे,उपसचिव सोनु राजपुत,हिशोब तपासणीक डॉ.विकास सुरवसे,सल्लागार मिलींद भड,निलेश चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य ,कार्यकारी,पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमात सार्इबाबांच्या मुर्तीची स्थापना सकाळी 9 वाजता करून सायंकाळी 6.30 वा.पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.7.00 ते 7.30 वा.हळदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर  9 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांना देण्यात आला.या कार्यक्रमास अनेक भाविक भक्तांनी बाबांचे दर्शन घेण्यासाठी कुतूंब गर्दी केली होती.या कार्यक्रमास अनेक भाविकांनी,दानशूरांनी मदत केली व ज्यांचे विशेष सहकार्य लाभले अशा सर्व दानशूरांचे कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार माणन्यात आले.

No comments