web-ads-yml-750x100

Breaking News

रायते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालयात प्रजासत्ताक दिन साजरा ; संतोष नामदेव सुरोशी यांच्या शुभहस्ते विद्दयार्थ्यांना बक्षिसांचे वाटप

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळ भिवंडी संचलित रायते विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय रायते  येथे आज माजी सरपंच,युवा सेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री.संतोष नामदेव सुरोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संतोष नामदेव सुरोशी हे विद्दयार्थी संघ रायते हायस्कूल व महाविद्दयालयाचे अध्यक्षस्थानी आहेत.यंदाचा ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला.यावेळी विविध देशभक्तीवर कार्यक्रम आयोजनात गुणवंत,यशस्वी,विजयी झालेल्या विद्दयार्थ्यांना बक्षिस तसेच प्रमाणपत्र संतोष नामदेव सुरोशी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर शाळेतील शिक्षक,पालकवर्ग,विद्दयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments