web-ads-yml-750x100

Breaking News

बेमुदत शिर्डी बंद मागे

BY – युवा महाराष्ट्र लाइव – शिर्डी |
साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण, शिर्डीवासियांनी घेतलेला शिर्डी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आज (रविवार) मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी गावच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देऊन याबाबत सोमवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळे साईभक्तांचा विचार करता सध्याचा बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात येणार आहे. उद्याच्या बैठकीत जर मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली येईल, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला

No comments