0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रत्नागिरी  जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत मंत्री उदय सामंत यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.                 
यावेळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, नळ पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते दुरूस्ती, तिवरे धरण, गणपतीपुळे, नाचणे म्हाडा प्रकल्प, पोलीस हाउसिंग योजना, मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास, पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यटनासाठी जागा उपलब्ध करणे, पाली येथे वाचनालयासाठी जागा उपलब्ध करुन घेणे, आरोग्य विभागाशी संबंधित रुग्णांना सर्व सोयी उपलब्ध करून देणे, अशा विविध विषयांवर आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले प्रश्न तeeeत्काळ मार्गी लावावे, असेही निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत श्री.सामंत यांनी दिले.
यावेळी कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.माधव कुसेकर, म्हाडाचे मुख्य अभियंता सुनील जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.    

Post a comment

 
Top