Breaking News

मुरबाड तहसिल कर्मचार्‍यांचा आज देशव्यापी संपामध्ये सहभाग तहसिलदाराना निवेदन

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
नागरिकविरोधी धोणांच्या निषेधार्थ आज देशातील 25 कोटी कामगार होणार्‍या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचा दावा दहा केंद्रीय कामगार संघटनांकडुन करण्यात आला आहे.याच देशव्यापी संपात मुरबाड तहसिल कार्यालयातील कर्मचारी वर्गाचा सुध्दा समावेश असणार असुन संपात 1)अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करावी 2) कंत्रीटी कर्मचारी यांची सेवा नियमित करण्यात यावी. 3) केंद्राप्रमाणे वाहतुक शैक्षणिक व होस्टेल भत्ता देण्यात यावा. 4) सेवानिवृत्ती चतुर्थश्रणी कर्मचार्‍यांच्या एका वारसाला पुर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्ती देण्यात यावी. 5) बक्षी समीतीच्या अहवालाचा दुसरा खंड प्रसिध्द करावा व लागु करावा. 6) अनुकंप भरती विनाअट सुरू करावी 7 महिला कर्मचार्‍यांना दोन वर्षाची बाल संगोपनाची रजा मंजुर करावी हे नमुद केलेल्या मांगण्या असणार असल्याचे मुरबाड तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात आहेत.सदर संपामध्ये महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना सहभागी होत असल्याने ठाणे जिल्हा महसुल कर्मचारी संघटना देखील या संपामध्ये 100 टक्के सहभागी होत आहे.संपामध्ये ठाणे जिल्हयातील सर्व नायब तहसिलदार अव्वल कारकुन लिपीक शिपार्इ वाहनचालक यांचा सहभाग असणार आहे.

No comments