0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. डाव्या संघटनेने अभाविपवर या हल्ल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला. आता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई-पुण्यातील विद्यार्थीही रस्त्यांवर उतरुन आंदोलन करत आहेत. जेएनयू येथील विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थी संघटनांनी नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. मुंबईतही विविध विद्यार्थी संघटानांनी जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर आणि पवईमध्ये विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत. तर पुण्यातही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात एफटीआयआयमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमा झाले. प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी या घटनेचा निषेध केला.

Post a comment

 
Top