0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
मध्य रेल्वेच्या ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील पहिल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडी आज गुरुवार पासून सुरु होत आहे. पहिली गाडी पनवेल स्थानकातून सुटणार आहे. या पहिल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडीला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी पनवेल येथून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतील. यावेळी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर पुरविण्यात येणा-या प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. ही वातानुकूलित गाडीच्‍या दररोज 16 फेऱ्या ठाणे–वाशी- पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावर चालवण्‍याचे प्रस्‍तावित आहे.
प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव आता घेता येणार आहे. या अडीच वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 31 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून पाच दिवस ही गाडी धावणार आहे. या लोकलची पहिली फेरी पहाटे 5.44 वाजता पनवेल-ठाणे मार्गावर होणार आहे. तर ठाणे-पनवेल मार्गावर रात्री 9.54 ला शेवटची फेरी असणार आहे. या लोकलच्या एकूण 16 फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Post a comment

 
Top