0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर सगळ्यांनाच भुरळ घालीत आले आहे, दरवर्षी हजारो लोक चित्रपटसृष्टीकडे आकर्षित होतात, या व्यवसायात करिअर करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते.
चित्रपट निर्मितीत कलाकारां व्यतिरिक्तही आवश्यक असलेल्या इतर अनेक संधींची तसेच या क्षेत्रातील आव्हानांची आणि धोक्यांचीही त्यांना ओळख व्हावी या उद्देशाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि कलांगण सांस्कृतिक मंच व मुंबई एकी ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शक-
१.विजय पाटकर (अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता)
२.समृध्दी पोरे (निर्माती,दिग्दर्शक)
३.पौर्णिमा ओक (वेशभुषा)
४. निनाद कामत (व्हाईस कल्चर)
५.प्रथमेश परब (अभिनेता )
६.एकनाथ कदम (कलादिग्दर्शक)
७. प्रसाद पालवनकर, सुनिल सावंत
  (रंगभूषा )
८.हेमंत शिंदे (व्हिज्युअल इफेक्ट्स )
९. योजना भावे - प्रोग्रामिंग हेड
( शेमारु इन्टरटेंटमेन्ट )
तसेच चित्रपटसृष्टीशी निगडित
स्वत:चा व्यवसाय करु इच्छिणार्‍यांसाठी आर्थिक मदतीविषयी मार्गदर्शन. कार्यशाळा विनामूल्य असून  चित्रपट व्यवसायात करिअर करु इच्छिणार्‍यां सर्वांसाठी आहे.
स्थळ- रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थियेटर,                तिसरा मजला, प्रभादेवी.
          दिनांक -२५ जानेवारी २०२०
वेळ - (कार्यशाळा दोन सत्रात होईल)
सत्र १- सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत
सत्र २-दुपारी २ते संध्याकाळी ६ पर्यत.
              आपले विनीत
श्री. बिभीषण चवरे (प्रकल्प संचालक)
पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
श्री. विजय पाटकर (अध्यक्ष) कलांगण सांस्कृतिक मंच

Post a comment

 
Top