0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली  |
इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता युद्धाचे रुप घेत आहे. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. यानंतर इराणने याचा सूड घेतला आहे. इराणकडून अमेरिकन दुतावासावर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणकडून हा हल्ला करण्यात आला.

Post a comment

 
Top